‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’; एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा टोला

0
653

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा परिवहन मंत्रि अनिल परब यांनी केली. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केलाय. अशातच आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचं सांगितलं. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधलाय.

एसटीचं आंदोलन आणि शेतकरी आंदोलन वेगळं असतं. याचा गृहपाठ न केल्यानं त्यांना तोंडघशी पडावं लागलं. ज्यांचं नेतृत्व करतो त्यांच्या अपेक्षा वाढतात. चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं अवघड. अन्यथा वाघ स्वार होणाऱ्यालाच खाऊन टाकतो, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : भाजपच्या ‘या’ महिला आमदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला; चर्चेला सुरुवात

दरम्यान, हे आंदोलन राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही- नितेश राणे

“मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here