मला पक्षातून बाहेर ढकलण्याचं काम केलं जातंय; डॅशिंग नेते वसंत मोरेंचा खळबळजनक आरोप

0
612

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पुण्यात मोरेंना भेटीसाठी बोलावलं होतं.

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरे यांनी रात्री साडेबारा वाजता एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये दोन बॅनर चिकटलेले असतांनाच तो व्हिडिओ होता. त्यामध्ये एक फोटो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तर दिसरा फोटो वसंत मोरे यांचा होता. यामध्ये वसंत मोरे यांनी राज ठाकरे आणि त्यांचं नातं दाखविण्यासाठी हा व्हिडिओ केल्याचे त्यांनी सांगितलं होतं. मात्र, माध्यमांशी बोलताना  मोरेंनी मोठा आरोप केला आहे.

हे ही वाचा  : मोठी बातमी: चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक

पक्षातून मला बाहेर ढकलण्याचं काम केलं जातं आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. तसेच माझी ताकत आजमवण्यापेक्षा पक्षासाठी ताकत लावा, असंही वसंत मोरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…

 वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा, पवारांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here