Home महाराष्ट्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे.

14 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं असून त्यांच्याशी गृहमंत्री अमित शहा चर्चा करणार आहेत. यावरून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्राला डिवचलं आहे.

अमित शहा यांची भेट घेऊन काही होणार नाही, असं म्हणत बोम्मईंनी थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. बोम्मई यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

हे ही वाचा  : वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा, पवारांना टोला

मी मिटिंगसाठी स्मशानात येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही; वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

“आई-बाबा घरी नाहीत तू ये…; प्रेयसीनं बोलवताच प्रियकर गेला आणि त्याच्यासोबत जे घडलं ते…”