एकनाथ शिंदेंचा मला देखील फोन आला होता, पण मी….; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

0
780

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा मलादेखील फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, असा गाैफ्यस्फोट अंबादास दानवे यांनी यावेळी केला. काल झालेल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

हे ही वाचा : शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

‘मला एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं मी, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांनी मला तुला मदत केली असल्याचे सांगितले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही पक्ष म्हणून मदत केली, स्वतः व्यक्तिगत नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मदत केली., असं उत्तर अंबादास दानवे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंना दिलं. त्यामुळे तुम्ही देखील भूलथापांना बळी पडू नका,  असं आवाहन अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 मोठी बातमी! शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ नेत्याची घरवापसी

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here