Home महाराष्ट्र शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनीदेखील बंडखोरी केली. यामुळे शिवसेना कोणाची? गटनेता कोणाचा? व्हीप कोणता खरा? असे प्रश्न जनतेला पडत आहेत. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी असं म्हणता येईल, असं सांगतानाच 18 पैकी 12 खासदार शिंदेगटाकडे, 55 पैकी 40 आमदार शिंदेगटाकडे आहेत, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

हे ही वाचा : ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गटनेता कोण? शिवसेना प्रमुख कोण? याच्यावर अजून दावा केला नाही, गटनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेनं भाजपची फसवणूक केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी युती आमदारांना-खासदारांना पसंत नव्हती. भाजप आमच सरकार पाडेलं असं ते नेहमी म्हणत होते. त्यांच्या गुणांमुळे हे सरकार पडणार होतं. आता त्यांचं सरकार पडलं आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 मोठी बातमी! शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ नेत्याची घरवापसी

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शिवसेना नेमकी कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…