Home पुणे ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद...

ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद झाल्यावर…; राज ठाकरेंचा खोचक टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आज मनसेला 16 वर्षे पू्र्ण झाली असून याच पार्श्वभूमीवर मनसेचा वर्धापनदिन सोहळा आज पुण्यात पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास जुन्या शैलीत भाषण केलं. यावेळी बोलताना राज यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. तसेच राज यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची नक्कल करत राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात त्यांची एक अॅक्शन असते. कॅमेरा लागला की हे सुरू. कॅमेरा हटला की पुन्हा नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात?, असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : ‘…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’; रामदास आठवलेंची खास शैलीत टीका

डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?, असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

 भाजपला धक्के सुरूच; या ‘दोन’ नगरसेवकांनी दिले राजीनामे; राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या?; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…