हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’, तर उद्धव ठाकरेंसाठी…; गोपीचंद पडळकरांची टीका

0
479

मुंबई :  या वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्याची शक्यता आहे. यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

आषाढी एकादशीच्या महिन्यात वारकऱ्यांच्या भगव्याचा अपमान करणारे आता आपल्या संधीसाधू राजकारणासाठी श्री गणेश मूर्तीची अशास्त्रीय पद्धतीनं स्थापना करून विटंबना करत आहेत. गणेशाची स्थापना ही पवित्र व प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या वरूनच सिद्ध होतं की शिवसेनेचं हिंदूत्व किती पोकळ झाले आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

दरमयान, ज्या हिंदुत्वाच्या सन्मानासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आजीवन लढा दिला त्याच हिंदुत्वाला उद्धव सेनेने सेना राजकीय स्वार्थासाठी साधन म्हणून वापर करत आहे. हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’ होती तर उद्धव ठाकरेंसाठी राजकीय स्वार्थाचे ‘साधन’ आहे… हिंदू देवी-देवतांचा राजकीय वापर करणाऱ्या उद्धवसेनेचा जाहीर निषेध, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राठोडांच्या विरोधात आणखी एका महिलेची पोलिसात तक्रार; चित्रा वाघ यांनी दिली माहिती

चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण

घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here