Home महाराष्ट्र क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांचं आज सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यानंतर हौसाताई पाटील यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. स्वातंत्र्याच्या पूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यानंतरही जनतेच्या प्रश्‍नासाठी लढा दिला. हौसाताई पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामानंतर हैदराबाद मुक्‍ती लढा, संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्‍ती संग्रामात भाग घेतला होता. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आणि पत्रीसरकारला मदत करण्यासाठी अनेक मोहिमांत भाग घेतला. गोव्यातून शस्त्रे आणून ती प्रतिसरकारला पुरवली आणि प्रतिसरकारची स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता तेवत ठेवली.

दरम्यान, हौसाताईंनी वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशिवाय जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी आदी सहकाऱ्यांबरोबरही अन्यायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आंदोलने, मोर्चे काढून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले होते.

महत्वाच्या घडामोडी –

दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

“कर्जतमध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

दरेकर काही चुकीचं बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय- चित्रा वाघ