Home महाराष्ट्र दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारित अध्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत राज्यपालांना टोला लगावला आहे. त्यांना दिल्लीतून फोन आला असेल, असा उपरोधक टोला नाना पटोलेंनी यावेळी राज्यपालांना लगावला.

आम्ही राज्यपालांच्या भूमिकेचं स्वागत करतो. पण ही सही जर दोन दिवसांपूर्वी झाली असती तर सर्वोच्च न्याायलयात भूमिका मांडणं सोपं झालं असतं. आता आता जे 6 जिल्ह्यात जिल्हा परिषद पोटनिवडणुका लागल्या आहेत. त्या ओबीसी आरक्षण अबाधित ठेवूनच झाल्या असत्या. माननीय सर्वोच्च न्यायालयानंही त्याला मान्यता दिली असती असं आम्हाला वाटतं., असं नाना पटोलेंनी म्हटलं.

त्यांना दिलीत्तून फोन आला असेल. कारण जेंव्हापासून केंद्रात भाजपचं सरकार आलं तेंव्हापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यपालांची खुर्ची चालते. हे अनेकदा त्यांच्या कृतीतून सिद्ध होतं. हे एकट्या महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे अन्य पक्षाचं सरकार आहे तिथे सरकार अस्थिर करण्याचं काम राज्यपालांकडून करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

“कर्जतमध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

दरेकर काही चुकीचं बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची टीका