Home महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या 5 वर्षातील अनियमिततेची गंभीर दखल घेत बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. यावरून प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.

मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. तरीही बॅंकेच्या विरोधातील कुठल्याही चौकशीला कायदेशीर मार्गाने उत्तर देण्यात येईल., असं दरेकर म्हणाले.

राज्य सरकारच्या विरोधात विविध प्रकरणात आरोप व टिका केल्यामुळेच सरकारने केवळ सुडाने व द्वेषापोटी कारवाईचा निर्णय घेतला आहे. परंतु विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारने कितीही आकसापोटी कारवाई केली तरी आमचा आवाज सरकार दाबू शकत नाही. जितका आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल तितक्याच जोमाने पुन्हा आम्ही आमचा आवाज उठवू, असा जोरदार इशारा दरेकरांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“कर्जतमध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

दरेकर काही चुकीचं बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची टीका

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचा टोला