आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व धर्मवीर आनंद दीघे यांच्याबाबत एक किस्सा सांगितला आहे.
ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
हे ही वाचा : भाजपाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?
आनंद दिघे यांच्यावर जेंव्हा ‘टाडा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली. पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच ‘टाडा’च्या बाहेर आले नसते, असं आव्हाड म्हणाले.
दरम्यान, यानंतर ‘ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
“आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”
शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट