मुंबई : झारखंडच्या श्रमिक आदिवासी जनतेने भूलथापा आणि अमिषांना बळी पडणं नाकरलं. हे सत्य स्विकारावं लागेल. जनतेला गृहित धरंल तर वेगळं काय होणार, असं म्हणत शिवसेनेने सामना मधून भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप एकापाठोपाठ राज्य गमावत चाललं आहे. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा भाजप करत होता. मात्र प्रत्यक्षात अनेक राज्य भाजप मुक्त झाली आहेत, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला आहे.
“नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारलं हे सत्य स्वीकारावं लागेल. लोकांनी ठरवलं की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालंच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टिकास्त्र सोडलं.
दरम्यान, भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार”, अशी टीकाही शिवसेनेन केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-‘या’ दिवशी होणार महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार!
-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!
-पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर
-शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…