Home क्रीडा भारताचा विराट विजय; 67 धावांनी उडवला विंडीजचा धुवा

भारताचा विराट विजय; 67 धावांनी उडवला विंडीजचा धुवा

207

मुंबई : वेस्ट इंडीज विरूद्ध भारताने विराट विजय मिळवला आहे. तिसऱ्या निर्णायक  टी-20 समान्यात भारताने विंडी़जचा 67 धावाने धुवा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली.

नाणे फेक जिंकून वेस्ट इंडिजने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिज सोमार 241 धावांचं मोठ आव्हान उभं केलं. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 8 गडी गमावत 173 धावा केल्या. भारताकडूत लोकेश राहूलने 56 चेंडूत 91 धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना भारताच्या रोहित शर्मा आणि लोकेश राहूल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. यामध्ये रोहित शर्माने 34 चेंडूत 71 धावा केल्या तर विराट कोहलीने तुफान  फटकेबाजी करत 29 चेंडूत 70 धावा केल्या.

दरम्यान, विंडिजकडून कर्णधार कायरन पोलार्डने 68 धावांची खेळी  आणि 1 बळी घेत एकाकी झुंज दिली.

महत्वाच्या घडामोडी –

मंत्रालयात आज बिनखात्याच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठक

“इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है”

असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत