Home देश असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत आज वादळी चर्चा झाली. या विधेयकावर ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र आक्षेप घेत. हे विधेयक या देशाची दुसरी फाळणी करणारं आहे. हिटरलपेक्षाही वाईट असं हे विधेयक असून सरकारने हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली.

या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत असतानाच त्यांनी आपल्या हातात असलेली विधेयकाची कॉपी फाडून टाकली. त्यानंतरही ओवेसींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं मात्र माफी मागतिली नाही. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे उद्या राहिलेली चर्चा होऊन या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला तसच ही कृती संसदेचा अपमान करणारी असल्यांचंही सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. तर या विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

” राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नाही तर राज्याच्या भल्याच्या”

रामदास आठवले मुर्ख आहेत, तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत- आनंदराज आंबेडकर

निलेश राणे यांनी केली विनायक राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

इंग्लंडच्या खेळाडूंनी केली पाकिस्तानची धुलाई; एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांंची शतकी खेळी