आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी स्वतःहून माफीनामा जारी केला आहे.
दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली, असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, असं त्यांनी निवेदनात म्हंटलं आहे.
हे ही वाचा : हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी
त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असंही भगतसिंग कोश्यारी यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, या माफीनाम्यापूर्वी त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले होते आणि आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र वाद संपत नाही तोच राज्यपालांनी आज माफी मागितली.
https://twitter.com/BSKoshyari/status/1554110135651418114?t=_DJJ-tURIOghDrBbY4LF5g&s=19
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट
संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता तुरूंगात जाणार; आमदार रवी राणा यांचा आरोप
