Home पुणे गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा

गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत मोठ्या उत्साहात विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी,जागोजागी फुगे आणि रंगीबेरंगी पताकांनी शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती.यावेळी प्रशालेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करून फुगे,चॉकलेट व ‘ वेल-कम कार्ड ‘ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सदर प्रवेशोत्सव कार्यक्रमाला आदर्श क्लासेसच्या अध्यक्षा स्वाती डोंगरे , लोकमतचे पत्रकार विशाल सातपुते, नवराष्ट्र चे पत्रकार ज्ञानेश्वर मोरे, बबनराव आमरुळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

हे ही  वाचा : मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि चालकाला केला सलाम

सदर पाहुण्यांच्या शुभहस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण व वह्या वाटप करण्यात आले. स्पंदन मेडिकल यांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांकरिता मोफत वह्या देण्यात आल्या. सदर उपक्रमाची संकल्पना प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांची होती.

दरम्यान,प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन गीतांजली कांबळे व विशाल चव्हाण यांनी केले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

जयंत पाटील यांच्या गाडीत खासदार संजय काका पाटील; विधानपरिषदेसाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?; चर्चांना उधाण

“शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…