Home देश शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठी आज दिल्लीत एक बैठकही पार पडली. मात्र बैठकीनंतर शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पवारांनी नकार का दिला?, हा प्रश्न सर्वांनाच पडला. यावरून आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं.

हे ही  वाचा : देवेंद्र फडणवीस म्हणजे…; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून माझं नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांंचे मी मनापासून आभार मानतो. पण नम्रपणे मी सांगतो की, माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सेवा सूरू ठेवण्यात मला आनंद आहे, असं शरद पवारांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपचा शिवसेनेला मोठा; शिवसेना महिला आघाडीतील अनेक महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”