Home पुणे मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि...

मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि चालकाला केला सलाम

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे कोरोना कालावधीतील दमदार कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत आले होते. आता तेच वसंत मोरे आपल्या आणखी एका कामामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केलेल्या मदतीमुळे ते पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

वसंत मोरे यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.

हे ही  वाचा : जयंत पाटील यांच्या गाडीत खासदार संजय काका पाटील; विधानपरिषदेसाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?; चर्चांना उधाण

वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज – कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएल ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.

थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे तेव्हा ते म्हणाले की आम्ही सासवडवरून आलोय, गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोन लागत नाही. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण, आणि आता रिक्षाही मिळत नाही. मग मी म्हटलं त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं मीच त्यांचा दीर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटोही काढला.

पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला ? थोडे तरी शहाणे व्हा.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणजे…; रावसाहेब दानवेंकडून कौतुक