Home महाराष्ट्र आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गाैतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गाैतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लावणी कलाकार गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

मात्र आज अखेर गाैतमी पाटीलचा हिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमांपैकी एका अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आज समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत

पुणे पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरु आहे. अल्पवयीन मुलाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आणखी दोघा-तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत गाैतमी पाटीलनं टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी ज्याला अटक केलीय तो खूप लहान मुलगा आहे. त्याचं वय 17 वर्षे इतकं आहे. त्या मुलाने व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी आज त्या मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी मला खूप मदत केली. मी याबद्दल पुणे पोलिसांचा आभार मानते. पोलिसांनी एकाला पडकलं आहे. अजून दोघं-तिघं आहेत. पोलीस त्यांनाही पकडतील. बरं वाटलं की आज कुणीतरी एकजण सापडलंय, अशी प्रतिक्रिया गाैतमी पाटीलनं यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत

“धक्कादायक! ना अजित दादा, ना सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘हे’ नाव आलं समोर”

शरद पवारांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंचं, पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…