“बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण”

0
384

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. या सगळ्या घडामोडींवर आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर वाटप जाहीर; मंत्रिमंडळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रीपद?; वाचा सविस्तर

आज अजित पवार अचानक शरद पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, काकू प्रतिभा पाटील यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याने विचारपूस करण्यासाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर गेल्याची माहिती मिळत आहे. पण घरी शरद पवार आहेत की नाहीत? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”

“खेडमध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, म्हणाले, कुणाशी युती नको, कुणाशी भानगड नको”

2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here