Home महाराष्ट्र अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करताना दिसत आहे आता या आंदोलनामध्ये मनसेनेदेखील उडी घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर मनसेचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला परिवहन मंत्री अनिल परब हेच जबाबदार आहे, असा आरोप करत या प्रकरणी परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.

हे ही वाचा : “मंत्रिमंडळाने आपला नैतिक अधिकार पूर्णपणे गमावला; उद्धवजी, आता तरी सरकार बरखास्त करा”

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून गंभीर बनला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संपूर्ण वाहतुक व्यवस्था ठप्प झाली होती. याचा सर्वाधिक फटका एसटी आणि कर्मचाऱ्यांना बसला होता. मात्र, याचे पडसाद अजूनही कायम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारदेखील अजूनही रखडले आहे. कोरोना काळात तर कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीवदेखील गमवावा लागला. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याचा संताप एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

देवेंद्रजींच्या हातात काही बाॅम्ब असतील तर त्यांनी तो फोडावा- संजय राऊत

“आदित्य ठाकरेंकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; फडणवीसांच्या नागपूरातील युवा मोर्चाचा ‘हा’ मोठा आता शिवसेनेत”

आम्ही नारायण राणेंसारख्यांना पुरून उरलो आहोत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल