Home नाशिक महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं...

महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. यानंतर भाजपकडून आघाडी सरकार काही दिवसांतच पडेल, अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या. त्या नाशिकच्या दौऱ्यावर होत्या.

हे ही वाचा : अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

नाशिकच्या दौऱ्यावर असताना भाजप नेत्या मुंडे कुलदैवत असलेल्या चांदवडच्या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार जावे  व भाजपचे सरकार यावे असे साकडे घातले का? असा प्रश्न केला. त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडावे. भाजपचे सरकार यावे, असे साकडे मी देवाजवळ घालत नाही. तसे साकडे घालायचेदेखील नसतात, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

युवा मोर्च्याची  अध्यक्ष असताना मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडेसाहेबांसोबत चांदवडला रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आले होते. चांदवडची रेणुकादेवी आमचे कुलदैवत असून तब्ब्ल सात वर्षांनंतर देवीच्या दर्शनाचा योग आला. मुंडेसाहेबांनी महिलांसाठी, गोरगरिबांसाठी व वंचितांसाठी जी लढाई सुरू केली त्यासाठी मला बळ मिळो, शेवटच्या श्वासापर्यंत मला त्यासाठी योगदान देता यावे, अशी प्रार्थना आपण देवीकडे केली आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी – 

“मंत्रिमंडळाने आपला नैतिक अधिकार पूर्णपणे गमावला; उद्धवजी, आता तरी सरकार बरखास्त करा”

देवेंद्रजींच्या हातात काही बाॅम्ब असतील तर त्यांनी तो फोडावा- संजय राऊत

“आदित्य ठाकरेंकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; फडणवीसांच्या नागपूरातील युवा मोर्चाचा ‘हा’ मोठा आता शिवसेनेत”