Home पुणे “आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”

“आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”

पुणे : जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध 3 पैलवान एकत्र आले तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणात केंद्र सरकारचा काही रोल नाही. हा राज्याचा विषय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो बदल केला आहे तो बदल केंद्राने कायदा करण्याच्या अगोदर केला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, 10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देण्याव्यतिरिक्त केंद्राचा यात काहीही रोल नाही. हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना माहित आहे. असं असताना सुद्धा हे केंद्राकडे ढकलत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडेंचा मोठा गाैफ्यस्फोट! करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधातून 2 मुलं”

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

राज ठाकरेंना टेनिस खेळत असताना दुखापत; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर