Home महाराष्ट्र “धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली. या तक्रारीबाबत प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिति स्पष्ट, होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”

“धनंजय मुंडेंचा मोठा गाैफ्यस्फोट! करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधातून 2 मुलं”

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र