मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी सरकारला यावेळी दिला. तसेच येणाऱ्या काळात भाजपचा प्रत्येक नेता राज्यातील सर्व भागातील लोकांशी, संघटनांशी संवाद साधतील., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
येत्या 26 जूनला राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय.
इतकंच नाही तर 26 जूनला ओबीसी समाजाचा संताप आम्ही रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण राज्यात 26 तारखेला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय.
दरम्यान, आज आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही सत्तेत होतो तेंव्हा आम्ही मोर्चा काढले नाहीत, रस्त्यावर उतरलो नाहीत. कारण, तेंव्हा आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये होतो. पण आता सरकारमधील मंत्रीच रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्याची भाषा करत आहेत, असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी सरकारवर केला.
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”
मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप
शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा
WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11