आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महत्वाची बाब म्हणजे शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती मिळतेय.
हे ही वाचा : जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता…; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते कल्याणराव काळे एकनाश शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती नागेश भोसलेही शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर पंढरपुरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’ मनसैनिकांचा आरोप
पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर हल्लाबोल