“एकनाथ खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार”

0
177

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे हे निष्ठावंत नेते नाहीत. पुढे पाहा काय काय होतंय. खडसेंनी मला त्रास दिला, शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. खडसेंनी जर माझ्या मतदार संघात हस्तक्षेप केला तर मी शिवसेना स्टाईलने त्यांना ऊत्तर देईन. मी आत्ताच या विषयावर फार बोलणार नाही.,असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मोहम्मद सिराज-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी: कोलकाताचे आरसीबीसमोर 85 धावांचे लक्ष्य

“…म्हणून प्रविण दरेकर यांना झाले अश्रू अनावर”

नाथाभाऊंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल- गुलाबराव पाटील

पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here