मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता ‘सुर्यवंशी’ या अगामी चित्रपटात झळकणार होत्या. मात्र आता या चित्रपटातून त्यांना बाहेर पडावं लागलं आहे. नीना यांनी चित्रपट सोडण्यामागे दिग्दर्शक रोहित शेट्टी असल्याचं सांगितलं आहे.
सुर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि अजय देवगण हे तीनही दिग्गज कलाकार झळकणार असून नीना गुप्ता यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती.
सुर्यवंशी’ या चित्रपटातील काही सीनचं नीना गुप्ता यांनी चित्रीकरणही केलं होतं. मात्र त्यानंतर या भूमिकेसाठी त्या योग्य नसल्याचं रोहित शेट्टीला जाणवलं त्यामुळे नीना यांना चित्रपटातून बाहेर काढावं लागलं.
चित्रपटाची कथा अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्याभोवती फिरताना दिसते. त्यामुळे माझ्या भूमिकेला विशेष वाव नसल्यामुळे रोहितने हा निर्णय घेतला, असं नीना गुप्ता यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी-
-शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
-भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण
-” सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करण्यापासून भाजपला कोणी रोखलं होतं?”
-डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त