“डाॅ.भागवत कराड पंकजा मुंडेंच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रीतमच्या नावाने जोरदार घोषणाबाजी”

0
535

परळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा आजपासून सुरु होत आहे. ही यात्रा बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघणार आहे.

आज सकाळी 9.30 च्या सुमारास भागवत कराड हे पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर कार्यकत्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, परळीच्या गोपीनाथ गडावरून भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. स्वतः पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यात सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आमच्या नादी लागू नका, पालकमंत्र्यांच्या नादी लागला तर शहरातही दिसणार नाही- गुलाबराव पाटील

बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील

नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले

“…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here