Home महाराष्ट्र “…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”

“…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं.

“गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकटआहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. जर परिस्थिती बिघडली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला तर कदाचित लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश कोरोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणार, ही प्रतिज्ञा आपण करूयात, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भागवत कराडांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम- पंकजा मुंडे

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; हसन मुश्रीफ यांचा टोला

“…तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”