Home महत्वाच्या बातम्या नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले

नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. या स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. परंतु स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात हुकुमशाही सत्ता सुरू झाली. परंतु, जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकीक आहे. भाजपा त्याला तिलांजली देऊ पाहत आहे. 14 ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. त्या रक्तरंजित दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत नरेंद्र मोदी व भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”

भागवत कराडांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम- पंकजा मुंडे

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; हसन मुश्रीफ यांचा टोला

“…तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल”