Home महाराष्ट्र बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील

बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीसाठी रणशिंग फुंकलंय. येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकर यांनी मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

दरम्यान, बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात ही लोकांची मागणी आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले

“…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”

भागवत कराडांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम- पंकजा मुंडे

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; हसन मुश्रीफ यांचा टोला