आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला. यासाठीच सोमय्या हे कोल्हापूरला जात असताना कराड येथून त्यांना मुंबईला परत पाठविण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपने आघाडी सरकार व मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर पुन्हा सोमय्यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. यावरून हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.
28 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन मुश्रीफांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.
किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्यावेळी प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कुणीही अडथळा निर्माण करु नका, त्यांना येऊ द्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही कृती करु नका. त्या दिवशी ऐकू वाटलं नाही तर टीव्ही बंद करा, शेतात जा. ते कुठे जातील, काय बोलतील ते त्यांना बोलू द्या, असं आवाहन मुश्रीफांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कारमध्ये रोमान्स पडला भारी! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणं झालं मुश्किल; कारण…
करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”
“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”