जळगाव : भुसावळ शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशातच भुसावळ शहरातील नगरसेवक पिंटू ठाकुर यांच्या प्रभागातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आले होते. यावेळी बोलताना त्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केलं.
भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक करणार आहे., असं गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हटलं. तसेच हे गुन्हेगार आता माझ्या रडारवर आहेत. अजूनपर्यंत त्यांना पालकमंत्री काय आहे ते दाखवलेलं नाही आणि ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत, असा दम गुलाबराव पाटलांनी यावेळी दिला.
दरम्यान, भुसावळ शहरातील विकास कामात अडथळा आणला जात आहे. भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत, ज्या मुख्य अधिकार्यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात असून नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील
नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले
“…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो”
भागवत कराडांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम- पंकजा मुंडे