मुंबई : दिल्लीमध्ये जेएनयू येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन या घटनेचा विरोध केला. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर स्वतंत्र काश्मीरचे नारे दिले जात आहेत. हे आंदोलन मुंबईत कशासाठी होतं आहे? आझादी गँग मुंबईत येऊन ठेपली आहे आणि नारेबाजी करत आहे. हे सगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली सुरु आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत का?, असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील
-सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर
-कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला
-“शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आलेत”