सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, अन्यथा…; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

0
375

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय.

माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, असं म्हणत सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना शाप दिलाय, त्यामुळे राणेंची अधोगती सुरू आहे- भास्कर जाधव

नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here