मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. या तक्रारीबाबत प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
“कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले.
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत
कालपासून समाज…
Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021
महत्वाच्या घडामोडी-
आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन
मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
राज ठाकरेंना टेनिस खेळत असताना दुखापत; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर
“कामगारांचे लढाऊ नेतृत्व हरपले; शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडिक यांचं निधन”