आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई बँकेत भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मोठा धक्का बसलाय. मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकरांचं मुंबई बँकेवरील अस्तित्व संपुष्टात आलं. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणूकीतही भाजप नेते प्रसाद लाड यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रसाद लाड या निकालावरून नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू होती. यावरून आता प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही’, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी करू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारही या जोडीला घाबरतं. सरकारही आम्ही काय रिअॅक्शन करु याला घाबरतं. दरेकर यांच्यावर नाराजीचा प्रश्नच येत नाही. कालच्या निवडणुकीत गद्दारी ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीनं केली आहे, असा घणाघाती आरोप लाड यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुंबई बँक निवडणूक दरेकर यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि त्यांचा घात केला. घात करुन निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं लाड यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना नेते गुलाबराव पाटील कोरोना पाॅझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती”
प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला