Home महाराष्ट्र भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार

भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर केला आहे. तसंच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे, याबाबतचे वृत्त दैनिक लोकमत या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली आहे. पोलिसांच्या मदतीने हे षडयंत्र घडवले होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असा आरोप शरद पवारांनी आहे.

माझे स्पष्ट मत आहे की तात्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचलेलं होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असंही शरद पवार म्हणाले

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वलोक हे समाजातील सन्मानित नागरिक आहेत, असं पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे

“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”

मनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावं- रामदास आठवले

“शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”