Home क्रीडा जयपुरविरुद्ध दिल्लीचा जोरदार पराभव; दिल्लीने चाखली पहिल्यांदाच पराभवाची चव

जयपुरविरुद्ध दिल्लीचा जोरदार पराभव; दिल्लीने चाखली पहिल्यांदाच पराभवाची चव

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

प्रो कबड्डी लीग 2021-2022 मधिल 45 वा सामना दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पँथर्स या संघांमध्ये झाला. या सामन्यात जयपुर संघाने 30-28 असा विजय मिळवला आहे.

दोन्ही संघातील हा सामना अतिशय संथ सुरु झाला. पहिल्या हाफमध्ये सामना 12-12 असा बरोबरीत उभा होता. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच दिल्लीने वेगवान गुण घेण्यास सुरुवात केली. मात्र अर्जुन व दीपक हुडा यांनी दिल्लीला मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवलं. दीपक हूडाने दोन गुण घेत दिल्लीला ऑल आउट करत एका गुणाची आघाडी घेतली.

हे ही वाचा : राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

सामन्याची दोन मिनिटे शिल्लक नवीन असताना बाद झाला. त्यानंतर जयपुरसाठी कर्णधार संदीप धूलने आशुला बाहेर करत संघाचा विजय निश्चित केला. नवीन कुमार तब्बल २८ सामन्यानंतर सुपर टेन करण्यात अपयशी ठरला.

दरम्यान, नवीनने यादरम्यान कारकिर्दीतील 600 रेडींग पॉइंट मिळवले नवीन प्रो कबड्डीमध्ये सर्वात वेगवान 600 पॉईंट घेणारा रेडर ठरला.

महत्वाच्या घडामोडी – 

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना कुणाला उमेद्वारी देणार?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात