Home महाराष्ट्र ड्रग्स प्रकरणी दीपिका, सारा, श्रद्धा यांची NCB कडून चाैकशी; दीपिका पादुकोण चाैकशीसाठी...

ड्रग्स प्रकरणी दीपिका, सारा, श्रद्धा यांची NCB कडून चाैकशी; दीपिका पादुकोण चाैकशीसाठी कार्यालयात दाखल

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये (एनसीबी) आज महत्वाच्या घडामोडी होणार आहेत. कारण अभिनेता सुशांत सिंह मृत्यूचा तपास सुरू असताना बाॅलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. यामध्ये बाॅलिवूडच्या स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची नावे समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांना समन देऊन हजर राहण्यास सांगितले आहे.

या तिघांची चाैकशी करणाऱ्या टीममध्ये एसआयटीचे हेड केपीएस मल्होत्रा यांचेसोबत तपास अधिकारी सुनिल कुमार आणि इंटेलिजन्सचे अधिकारी निरज कुमार हे देखील सहभागी झाले आहेत. तसेच एनसीबीचा टीम दीपिका, सारा, श्रद्धा यांची ड्रग्स संबंधित चॅटची चाैकशी करेल.

दरम्यान, दीपिका पादुकोण चाैकशीसाठी कार्यालयात दाखल झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय”

ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं; नितेश राणेंचं सूचक वक्तव्य

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार; सरकार मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल