Home महाराष्ट्र ‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम...

‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम रद्द”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेचं धनुष्य आता आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

‘राज ठाकरे यांच्या ताफ्यातील एका कर्माचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी पुढील 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. तसेच राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

‘या’ मराठी चित्रपटात राज ठाकरे यांनी साकारलीये मुख्य भूमिका, तुम्ही बघितलंत कधी त्यांचं हे रूप?

“पंकजा मुंडेनंतर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई कोरोना पाॅझिटिव्ह”

“नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो, माझ्या नादी कुणी लागू नये”