Home देश काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कळंगुट : गोव्यातील महत्त्वाच मतदारसंघ माणल्या जाणाऱ्या कळंगुट मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मायकल लोबो यांनी सोमवारी भाजपला सोडचिट्ठी दिली असून अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात आल्या आहेत.

भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो हे एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी पंगा घेतला होता.

हे ही वाचा : भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा

भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपाऊसकर तसंच मॉविन गुदिन्हो यांच्यासोबत मायकल लोबो यांचे खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशातच आता ऐक निवडणुकीचा तोंडावर त्यांनी भाजपला राम-राम केलाय.

दरम्यान,  पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण खळबळ माजली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका; ‘य़ा’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

शरद पवारांनी कोणत्या अधिकारांनी एसटी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली?; भाजपच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”