Home महाराष्ट्र ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग…; निलेश राणेंचा हल्लाबोल

ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग…; निलेश राणेंचा हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच शिवसेना आणि बाळासाहबे ठाकरेंचे नाव न वापरता मैदानात येवून दाखवा, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिला होता. यालाच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंना तुम्ही ठाकरे नाव न वापरता आणि रस्त्यावर या… मग तुम्हाला तुमची किंमत कळेल.  गुवाहटीला गेलेले स्वखुशीने गेले नाहीत. उद्धव ठाकरेंमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आम्हीही खुशीने पक्ष सोडला नाही. यामागेही उद्धव ठाकरेच होते, असं निलेश राणे म्हणाले.

हे ही  वाचा : शिवसेनेतील बंडखोरीवर, ओवेसींची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा आणि हे आदित्य ला पण सांगा, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा दावा

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार फोडले; मनसेनं शिवसेनेला डिवचलं”

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…