नागपूर | नागरिकत्व सुधारणा कायदा हा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझी जात वंजारी आहे, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात केलं. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विधानसभेत विरोध दर्शविला आहे.
माझी जात वंजारी आहे. माझ्या समाजातील 50 टक्के जनता शेतमजुरी करायला जाते. अशा बाहेर गेलेल्या अनेक शेतमजुरांची बाळंतपणेसुद्धा शेतात होत असतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
राज्यातील मोठा वर्ग भटक्या पद्धतीने जीवन जगतो. त्यांची ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद हद्दीत अजूनही नोंद झालेली नाही. जवळपास जवळपास 90 ते 95% भटक्या लोकांकडे रहिवाशी प्रमाणपत्र नाही मग त्यांना रेशनकार्ड कस मिळेल. स्वतःची जमीन नाही, रेशनकार्ड नाही मग यांनी नागरिक आहे म्हणून कसं सिध्द करावं?, असंही आव्हड म्हणाले
भारतात माझ्या जातीसारख्या सहा हजार सातशे जाती आहेत. ज्यांचे घर नाही, दार नाही त्यांच्याकडे कोणतेही दाखले नाहीत. ही हिंदू-मुस्लीम लढाई नाही तर ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंताची लढाई आहे. ही लढाई मलबार हिल आणि गडचिरोलीतील पाड्यावर राहणाऱ्या माणसांची लढाई आहे, असंही ते म्हणाले
महत्वाच्या घडामोडी-
-आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर
-रोहित शेट्टीमुळे अभिनेत्री नीना गुप्ता यांना सोडावा लागला ‘हा’ चित्रपट
-शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
-भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण