ख्रिस गेल-मनदिप सिंगची धमाकेदार खेळी; पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सनी विजय

0
211

दुबई : आजच्या आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सनी पराभव केला.

किंग्स इलेव्हन पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावत 149 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने 45 चेंडूत 57 धावा, कर्णधार इयाॅन माॅर्गनने 25 चेंडूत 40 धावा, तर लाैकी फरग्युसनने 13 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 3, ख्रिस जाॅर्डन व रवि बिश्नोईने 2, तर मुरूगन अश्विनने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना पंजाबने हे लक्ष्य केवळ 18.5 षटकात 2 गडी गमावत पूर्ण केले. पंजाबकडून मनदिप सिंगने 56 चेंडूत नाबाद 66 धावा तर ख्रिस गेलने 29 चेंडूत 51 धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला. तर कोलकाताकडून वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

अजित दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये- राजेश टोपे

महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच; अशोक चव्हाणांचं विरोधकांना आव्हान

“नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या?”

संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here