“सरकार चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

0
183

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी मारहाण झालेल्या माजी नाैदल अधिकारी मदन शर्मा यांची भेट घेतली. यानंतर मदन शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मी फक्त पोस्ट फॉरवर्ड केली होती, पण ते कार्टुन उदय महेश्वरी यांनी काढलं आहे. त्यांना पकडायचं सोडून मला पकडले, ही त्यांची क्रिएटीव्हीटी, असं म्हणत मदन शर्मा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here