Home देश लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?

लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

या गोष्टींवर लावण्यात आले आहेत निर्बंध
– आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
– मेट्रो सेवा
– शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिकवणीला परवानगी
– हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार
– चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
– सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम
– सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार आहेत
– ६५ हून जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, व्याधी असणारे, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा लहान मुलांनी घरातच थांबावं.

कोणत्या गोष्टींना परवानगी
– बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असणार आहे.
– कंटेनमेंट झोनला यामधून वगळण्यात आलेलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“साईंचं सोनं देशाच्या उपयोगी येत असेल तर भक्तांना आनंद होईल”

…तर काय भलं होणार आपलं; निलेश राणेची राज्य सरकारवर टीका

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; किरीट सोमय्यांच मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र

संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; म्हणाले…