Home महाराष्ट्र “सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”

“सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये रविवारी 17 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आहे.

सांगलीत 2016 मध्ये काढण्यात आलेल्या मोर्चापेक्षाही हा मोर्चा अधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच मोर्चा शांततेत आणि लक्षवेधी होण्यााठी जिल्हाभर बैठका घेण्यात येत असून सोशल मीडियावरूनही जनजागृती करण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : “रिलायन्स ज्वेल्स सशस्त्र दरोड्याप्रकरणी, पहिल्या आरोपीला पकडण्यात सांगली पोलिसांना यश, ओडिसातून आरोपीला ठोकल्या बेड्या”

मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असणार आहे. शहरात विविध बैठकांसह आता गावामध्येही कार्यकर्ते एकत्र येत मोर्चात सहभागी होण्यासाठी नियोजन करत आहेत.

दरम्यान,  भव्य दिव्य आणि संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल, असा मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आल्यानंतर लगेचच मोर्चाची हाक देण्यात आली होती.

महत्त्वाच्या घडामोडी –

नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत; आता मनोज जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

…तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

“जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”