Home महाराष्ट्र पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला

पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आघाडीसाठी हात पुढे केला आहे. काँग्रेसनंतर आता भाजपाने शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : ‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का?; यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल

अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंग सिरसा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ते दिल्ली शीख गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे भाजपाच्या गळाला अकाली दलाचा बडा नेता लागला असल्याचं बोललं जात आहे. सिरसा यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते.

दरम्यान, भविष्यात पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदरसिंगांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपासमोर आघाडीसाठी हात पुढे केला.

महत्वाच्या घडामोडी –

“आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो”

वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक; महापालिका आयुक्तांना लिहिलं पत्र; म्हणाले…

ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…